सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच उमेदवारांना ही मोठी संधी असून बंपर भरती साठी लगेचच अर्ज करायला हवा. एसबीआयमध्ये ज्युनियर एसोसिएट (कस्टमर सपोर्ट एंड सेल्स) च्या पदांसाठी ही भरती निघाली असून उमेदवारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन sbi.co.in उमेदवारांना अर्ज करता येनार आहे . त्यासाठी, नोंदणी प्रक्रिया बुधवार 17 डिसेंबरपासून सुरू होत आहे. तर, 7 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. (sbi clerk bharti 2025 apply online)
पदाचे नाव | पदसंख्या |
● ज्युनियर एसोसिएट (कस्टमर सपोर्ट एंड सेल्स) | 13735 पदे |
◆ उपयुक्त पुस्तक खरेदी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://amzn.to/41Vp0zf
● शैक्षणिक पात्रता : ( sbi clerk bharti 2025 apply online education qualification)
उमेदवारांकडे कुठल्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. इंटीग्रेटेड डूअल डिग्री (आईडीडी) सर्टिफिकेट वाल्या उमेदवारांनी 31 डिसेंबर 2024 च्या अगोदर आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

● अर्ज भरण्यासाठी सुरुवात | 17 डिसेंबर 2024 |
● अर्ज भरण्याची अंतिम तारीख | 7 जानेवारी 2025 |
● प्रिलियम परीक्षेची अंदाजे तारीख- | फेब्रुवारी 2025 |
● मुख्य परीक्षेची अंदाजे तारीख- | मार्च/एप्रिल 2025 |
● वयोमर्यादा ( sbi clerk bharti 2025 apply online age limit )
उमेदवाराचे वय हे 1 एप्रिल 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी व 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 च्या अगोदर आणि 1 एप्रिल 2004 च्या नंतर झालेला नसावा.
काही प्रवर्गांना / श्रेणींना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे-
१. अनुसुचित जाती/ जमाती (SC/ST) – पाच वर्षे
२. इतर मागासवर्गीय (OBC) – तीन वर्षे
३. PwBD (Gen/EWS) – १० वर्षे
४. PwBD (SC/ST) – १५ वर्षे
५. PwBD (OBC) – १३ वर्षे
६. माजी सैनिक – संरक्षण सेवांमध्ये सादर केलेल्या सेवेचा वास्तविक कालावधी + 3 वर्षे, (अनुसूचित जाती/जमातीतील अपंग माजी सैनिकांसाठी 8 वर्षे) कमाल. वय 50 वर्षे
७. विधवा, घटस्फोटित महिला आणि न्यायिकरित्या त्यांच्या पतीपासून विभक्त झालेल्या आणि पुनर्विवाह न केलेल्या महिला- ७ वर्षे (सामान्य/ईडब्ल्यूएससाठी कमाल ३५ वर्षे, ओबीसीसाठी ३८ वर्षे आणि SC/ST उमेदवारांसाठी ४० वर्षे वयोमर्यादेच्या अधीन)
८. SBI चे प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी – SC/ST- ६ वर्षे, OBC- ४ वर्षे, GEN/EWS १ वर्ष, PwBD (SC/ST) – १६ वर्षे, PwBD (OBC) – १४ वर्षे, PwBD (जनरल/EWS) – ११ वर्षे
● अर्ज करण्यासाठी फी – ( sbi clerk bharti 2025 apply online application fees )
- General/OBC/EWS -Rs.750/-
- SC/ST/PwBD/XS/DXS- No Fees
अर्ज भरणासाठी लिंक – | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | sbi.co.in |
● उमेदवार फक्त एका राज्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही ज्या राज्यासाठी अर्ज करत आहात त्या राज्याच्या स्थानिक भाषेचे (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) तुम्हाला चांगले ज्ञान असले पाहिजे. मध्य प्रदेशसाठी १३१७, छत्तीसगडसाठी ४८३, चंदीगडसाठी ३२, दिल्लीसाठी ३४३, जम्मू आणि काश्मीरसाठी १४१, हिमाचलसाठी १७०, पंजाबसाठी ५६९, राजस्थानसाठी ४४५, उत्तर प्रदेशसाठी १८९४, उत्तराखंडसाठी ३१६, बिहारसाठी ११११, गुजरातसाठी १०७३, झारखंडसाठी ६७६, महाराष्ट्रासाठी ११६३.
➤ इतर नोकर भरती : :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
➤ टेलिग्राम ग्रुप ला Join होण्यासाठी :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |
sbi clerk bharti 2025 apply online PDF
〇 विशेष सूचना -उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

● पगार – ( sbi clerk payment )
रु १७,९०० – रु ४७९२०. मूळ वेतन (basic salary SBI clerk)- १९,९०० रु.
● निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत- (sbi clerk bharti 2025 apply online Selection Process and Examination Methodology)
निवड प्रक्रिया – (sbi clerk bharti 2025 apply online Selection Process )
उमेदवाराची सर्व प्रथम ऑनलाइन प्राथमिक परीक्षा होईल. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना स्थानिक भाषेची चाचणी द्यावी लागेल. स्थानिक भाषेची चाचणी अर्ज भरताना निवडलेल्या स्थानिक भाषेत घेतली जाईल.
● प्राथमिक परीक्षा कशी असणार? (sbi clerk bharti 2025 apply online Examination Methodology)
ही परीक्षा १ तासाची असेल ज्यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता यासंबंधी एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. प्राथमिक परीक्षेसाठी १०० गुण निर्धारित केले जातील. इंग्रजी विभागासाठी ३० गुण आणि संख्यात्मक आणि तर्कशास्त्रासाठी प्रत्येकी ३५ गुण असतील. संपूर्ण परीक्षेसाठी, उमेदवाराला एक तास आणि एका विभागाचे प्रश्न सुमारे २० मिनिटांत सोडवावे लागतील. प्राथमिक परीक्षेतील प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कापले जातील.