BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत)” या पदांच्या एकूण 690 एवढ्या रिक्त जागा भरण्यासाठीची पदांनुसार तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रियेस सुरवात झालेली आहे . तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 हि आहे.
पदाचे नाव – | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल), दुय्यम अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) |
पदसंख्या – | 690 जागा |
शैक्षणिक पात्रता – | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.) |
अर्ज पद्धती – | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण – | मुंबई |
अर्ज सुरु होण्याची तारीख – | 11 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख – | 16 डिसेंबर 2024 |
अधिकृत वेबसाईट – | https://www.mcgm.gov.in/ |
● BMC Recruitment 2024 Posts details : पदसंख्या खालीलप्रमाणे-
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 233 |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 250 |
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) | 130 |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | 77 |
जाहिरात PDF,अधिकृत वेबसाईट व ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक खालीलप्रमाणे-
Online अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा. |
PDF जाहिरातीसाठी | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | http://www.mcgm.gov.in |
बृहन्मुंबई महानगरपालिका महामंडळ अभियंता अर्ज 2024 साठी अर्ज कसा करावा या विषयाबाबत माहिती –
- अर्ज हा सादर करण्याबाबतच्या सविस्तर सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- वरील पदांकरीता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर ( वेबसाईट ) वर सादर करावा.
- अर्ज करण्यासाठी सुरु होण्याची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.
- तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 असणार आहे.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक असणारी पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अधिक माहितीसाठी दिलेली PDF जाहिरात बघावी
- अर्ज भरण्यापूर्वी PDF जाहिरात व अधिकृत वेबसाईट वरील माहिती पूर्णपणे व्यवस्तीत वाचून अर्ज भरावा.
● बृहन्मुंबई महानगरपालिका भरती पुस्तक लिंक – https://amzn.to/3NPwU4C
● BMC Recruitment 2024 Payment details : पगार या विषयी आपण खलील प्रमाणे माहिती पाहुयात –
पदांचे नाव | वेतनश्रेणी |
दुय्यम अभियंता (स्थापत्य) | 44900/- ते 142400/- |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 41800/- ते 132300/- |
कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल) | 41800/- ते 132300/- |
दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्युत) | 44900/- ते 142400/- |
मुंबई महापालिकेमध्ये नगर अभियंता या मध्यवर्ती कार्यालयाकडून 690 एवढ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया ही जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुंबई महापालिका यांनी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), दुय्यम अभियंता(स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांसाठीची भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात ही प्रसिद्ध केली गेलेली आहे. तसेच या भरतीद्वारे मुंबई महापालिकेमध्ये नोकरी करण्याची ज्या उमेदवारांना इच्छा आहे अशा उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचून अर्ज हे सादर करावे.
● दुय्यम अभियंता (स्थापत्य)-
या पदाच्या जवळपास एकूण 233 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत. तसेच हे पद गट ब या वर्गामध्ये येते. तसेच या पदावर भरती झालेल्या उमेदवाराना जवळपास 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणी नुसार वेतन मिळणार आहे. तसेच या 233 जागांच्या पैकी 22 जागा या अनुसूचित जाती प्रवर्ग, 14 जागा या अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 4 जागा, भटक्या जमाती (ब) साठी 2 जागा , भटक्या जमाती(क) प्रवर्ग यांच्यासाठी 8 जागा, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 6 जगा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच विशेष मागास प्रवर्ग यांच्यासाठी 7 जागा, ओबीसी साठी 47 जागा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग यांच्यासाठी 23 जागा, ईडब्ल्यूएससाठी 23 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 77 जागा आहे.
● दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)
या पदांच्या जवळपास एकूण 77 जागा भरल्या जाणार आहे. तसेच हे पद गट ब मध्ये येतं. तसेच या पदावर भरती झालेल्या उमेदवाराना 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणी नुसार वेतन मिळनार आहे. या 77 जागांपैकी 16 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 4 जागा अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 2 जागा, भटक्या जमाती (ब) साठी 2 जागा, भटक्या जमाती(क) प्रवर्ग यांच्यासाठी 1 जागा, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 1 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे. तसेच ओबीसीसाठी 10 जागा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गसाठी 18 जागा, ईडब्ल्यूएससाठी 8 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 25 जागा आहे.
● कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) –
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) गट क या पदाच्या जवळपास एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत. तसेच या पदासाठी वेतनश्रेणी जवळपास 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 130 पदांन पैकी 12 जागा या अनुसूचित जाती प्रवर्ग, 10 जागा या अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 1 जागा, भटक्या जमाती (ब) साठी 3 जागा, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5 जागा, भटक्या जमाती (ड) या प्रवर्गासाठी 2 जगा या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. विशेष मागास प्रवर्ग या साठी 2 जागा, ओबीसी 20 जागा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 13 जागा, ईडब्ल्यूएससाठी 18 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 44 जागा आहेत.
● कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या जवळपास एकूण 250 एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत. तसेच हे पद गट क मधील आहे. या पदावरती भरती झालेल्या उमेदवाराला जवळपास 41800-132300 आणि इतर भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल.तसेच या पदाच्या 250 जागांपैकी 24 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गसाठी, 37 जागा या अनुसूचित जमाती प्रवर्गसाठी, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 8 जागा, भटक्या जमाती (ब) साठी 2 जागा, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5 जागा, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 4 जगा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी 4 जागा, ओबीसीसाठी 35 जागा, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी 25 जागा, ईडब्ल्यूएससाठी 22 जागा आणि खुल्या प्रवर्गासाठी 84 जागा आहे.
➤ इतर नोकर भरती : :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इतर नोकर भरती :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |
◆आपला अर्ज भरताना अधिकृत website वर जाऊन व PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून उमेदवारांनी आपला अर्ज दाखल करावा.
अशाच नव-नवीन माहिती साठी शेजारी दिलेल्या 🔔 आयकॉन वर क्लिक करून subscribe बटण वर क्लिक करा.