❝ Canara Bank Recruitment 2024 : तुम्ही बँकेत नोकरीच्या शोधत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.❞
Canara Bank Recruitment 2024 : बँकेमध्ये नोकरी च्या शोधात असणाऱ्या किंवा रोजगाराच्या शोधात असणारे पदवीधर उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्यां उमेदवांसाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. कॅनरा बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे . कॅनरा बँकेकडून ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस पदांसाठीची भरतीच्या प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलीये. ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरती असे म्हणावे लागेल, कारण एकूण तीन हजार पदांसाठीची ही भरती असणार आहे. तुम्ही बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही कॅनरा बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. तर चला मग जाणून घ्या या भरतीच्या प्रक्रियेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे.

Canara Bank Recruitment 2024 : या भरतीसाठीची अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस २१ सप्टेंबर रोजी सुरू होईल आणि ४ ऑक्टोबर २०२४ रोजी संपेल. पात्र असणाऱ्या उमेदवारांना बँकेत शिकाऊ उमेदवारीसाठी अर्ज करण्यापूर्वी, http://www.nats.education.gov.in या ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर नोंदणी करणे हे आवश्यक आहे. ॲप्रेंटिसशिप पोर्टलवर १००% पूर्ण प्रोफाइल असलेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
○ पदाचे नाव – | पदवीधर प्रशिक्षणार्थी |
○ पदसंख्या – | ३००० जागा. |
○ वयोमर्यादा – | २० ते २८ वर्षे. |
○ शैक्षणिक पात्रता – | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. |
○ अर्ज करण्याची शेवटची तारीख – | ४ ऑक्टोबर २०२४. |
○ अर्ज करण्याची पद्धत – | ऑनलाईन. |
○ अर्ज करण्यासाठी लिंक – | येथे क्लिक करा. |
○ अधिकृत वेबसाईट – | www.canarabank.com |
पदाचे नाव : पदवीधर प्रशिक्षणार्थी
Category | पद संख्या |
SC | 479 |
ST | 184 |
OBC | 740 |
EWS | 295 |
UR | 1302 |
एकूण : | 3000 |
Canara Bank Recruitment 2024: पात्रता,वयोमर्यादा,निवड प्रक्रिया,अर्जाची फी याविषयीची माहिती खालीलप्रमाणे पाहुयात :-
❍ पात्रता :-
Canara Bank Recruitment 2024: ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्याकडे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
❍ वयोमर्यादा : –
उमेदवारांचा जन्म ०१.९.१९९६ आणि ०१.०९.२००४ दरम्यान झालेला असावा. म्हणजे, पात्रतेच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे.
Canara Bank Recruitment 2024:
❍ वेतनश्रेणी : Stipend- Rs.10,500/- Per Month.
❍ निवड प्रक्रिया :-
अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्तायादी १२ वी आणि डिप्लोमा परीक्षेत मिळालेल्या गुण/टक्केवारीच्या आधारे उतरत्या क्रमाने राज्यानुसार तयार केली जाईल. ऑनलाइन अर्ज करताना उमेदवाराने सादर केलेल्या माहितीच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाईल. दस्तऐवज संकलन आणि दस्तऐवज पडताळणी प्रक्रियेदरम्यान स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.
❍ अर्ज फी :-
- सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी ५०० /- आहे.
- SC/ST/PwBD श्रेणीतील उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
- डेबिट कार्ड (RuPay/ Visa/ MasterCard/ Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड्स किंवा मोबाइल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते.
- अधिक संबंधित तपशिलांसाठी उमेदवार कॅनरा बँकेची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.
Canara Bank Recruitment 2024: अर्ज कसा करावा याविषयीची माहिती घेऊयात ?
अर्ज ऑनलाईन पद्धतीने हा करायचा आहे. उमेदवारांनी वरील बाजूस दिलेल्या लिंक वरून अर्ज हा सादर करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी. अंतिम सबमिशन केल्यानंतर, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज तयार केलेल्या प्रणालीची प्रिंटआउट घ्यावी . अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे. अधिक माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
➤ इतर नोकर भरती : :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ भरती/नौकरी व योजनांच्या Facebook ग्रुप ला जॉइन करा:⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इतर नोकर भरती :⟹ | येथे क्लिक करा. |
➤ इंस्टाग्राम :⟹ | येथे क्लिक करा. |
राज्याप्रमाणे भाषा व जागा – State wise / UT Local Language No. of Post
