TET Exam 2024 Maharashtra : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा MahaTET 2024 संदर्भातील PDF परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी हे परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) परीक्षेचे वेळापत्रक हे देण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. दोन पेपर असल्याने सकाळच्या सत्रात एक आणि दुपारच्या सत्रात एक असे परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनी दिली आहे.
TET Exam 2024 Maharashtra : महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता. १ ली ते ५ वी व इयत्ता .६ वी ते इयत्ता .८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित / विना अनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्ती होण्यासाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ हि सर्व माहिती खालील पोस्ट मध्ये देण्यात आला आहे. या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सुचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परीक्षेचे वेळापत्रक-
TET Exam 2024 Maharashtra : या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी हा ९ सप्टेंबर २०२४ ते ३0 सप्टेंबर २०२४ असणार आहे. तसेच परीक्षेचे प्रवेश पात्राची ऑनलाइन प्रिंट काढून घेण्यासाठीची तारीख दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ एवढा कालावधी उमेदवाराला मिळणार आहे. उमेदवाराने १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडेदहा ते एक दरम्यान शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक होणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रात दोन ते साडेचार दरम्यान पेपर क्रमांक दोन होणार आहे
TET Exam 2024 Maharashtra
● PDF जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा.
○ MH TET पूर्ण-फॉर्म ➺ | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा |
○ परीक्षेचे नाव ➺ | महा टीईटी 2024 |
○ परीक्षेचा प्रकार ➺ | शिक्षक पात्रता परीक्षा |
○ परीक्षेची पातळी ➺ | राज्यस्तरीय |
○ ऑर्गनायझिंग बॉडी ➺ | महाराष्ट्र राज्य परिषद |
○ अर्जाची पद्धत ➺ | ऑनलाइन मोड |
○ परीक्षेची पद्धत ➺ | ऑफलाइन मोड (PPT) |
○ परीक्षेचा कालावधी ➺ | 03 तास |
○ परीक्षेची तारीख ➺ | १० नोव्हेंबर २०२४ |
○ अधिकृत वेबसाइट ➺ | mahatet.in |
● महाराष्ट्र TET 2024 महत्वाच्या तारखा :
महत्वाच्या तारखा : ➔ | |
○ ऑनलाइन अर्जाच्या उपलब्धतेची तारीख ➔ | 9 सप्टेंबर 2024 |
○ ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख ➔ | 30 सप्टेंबर 2024 |
○ प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख ➔ | 28 ऑक्टोबर 2024 |
○ प्रवेश परीक्षेची तारीख ➔ | 10 नोव्हेंबर 2024 |
○ प्रवेश परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या घोषणेची तारीख ➔ | डिसेंबर २०२४ चा पहिला आठवडा |
○ प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख ➔ | डिसेंबर २०२४ चा चौथा आठवडा |
○ महा टीईटी 2024 समुपदेशन सत्राची तारीख ➔ | डिसेंबर २०२४ चा चौथा आठवडा |
इतर नोकर भरती : | येथे क्लिक करा. |
भरती/नौकरी Facebook ग्रुप ला जॉइन करा : | येथे क्लिक करा. |
इंस्टाग्राम (Instagram) : | येथे क्लिक करा. |
● परीक्षा शुल्क खालील प्रमाणे –
● पेपर I किंवा पेपर II (Paper I or Paper II) –
- अनुसूचित जाती – (SC) – Rs. 700 /-
- अनुसूचित जमाती – (ST) – Rs. 700 /-
- अपंग उमेदवार (४०% किंवा ४०% पेक्षा जास्त) – Rs. 700 /-
- इतर उमेदवार (VJA/DTA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, Open) – Rs. 1000 /-
● Both Papers (Paper I + Paper II) –
- अनुसूचित जाती – (SC) – Rs. 900 /-
- अनुसूचित जमाती – (ST) – Rs. 900 /-
- अपंग उमेदवार (४०% किंवा ४०% पेक्षा जास्त) – Rs. 900 /-
- इतर उमेदवार (VJA/DTA, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, SEBC, EWS, Open) – Rs. 1200 /-
MAHA TET EXAM अर्ज 2024 कसा भरायचा ?
महाराष्ट्र TET अर्ज भरण्यासाठी, उमेदवारांना प्रथम MAHA TET नोंदणी 2024 ( mahatet.in) वेबसाईट वर जायचे आहे , त्यानंतर अर्ज सादर करणे आणि अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
Step : 1 – महाराष्ट्रामध्ये टीईटी परीक्षेसाठी नोंदणी कशी करावी ?
प्रथम, उमेदवारांनी परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करणे हे आवश्यक आहे. यासाठी, उमेदवार खालीप्रमाणे माहिती वाचून व खालील दिलेल्या क्रमाप्रमाणे नोंदणी करू शकतात:
- mahatet.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- नवीन नोंदणीसाठी तेथे उपलब्ध असलेल्या लिंक / बटणावर क्लिक करा.
- नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती भरा.
- MAHA TET २०२४ नोंदणी फॉर्म सबमिट करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा.
- नोंदणी आयडी आणि पासवर्ड नोंदवा.
थेट महा टीईटी नोंदणी 2024 लिंक – येथे क्लिक करा.
Step : 2 – उमेदवार MAHA TET चा अर्ज भरण्यासाठी ची प्रक्रिया पाहुयात ?
नोंदणी केलेला आयडी आणि पासवर्ड वापरून नोंदणीकृत खात्यात लॉग इन करा.
MAHA TET अर्जामध्ये विचारलेले सर्व तपशील व्यवस्तीत काळजीपूर्वक भरा जसे की शैक्षणिक तपशील, परीक्षेतील शहरांसाठी प्राधान्य इ.
फोटो आणि (सही) स्वाक्षरीच्या व्यवस्तीत स्कॅन केलेल्या फोटो अपलोड करा.
अर्जाचे तपशीलवार तपासा आणि आवश्यक असल्यास तपशील संपादित करा.
Step:3- MAHA TET अर्ज फी
TET Exam 2024 Maharashtra : अर्जामध्ये भरलेला सर्व तपशील बरोबर असल्यास, उमेदवार MAHA TET अर्जची फी भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात. उमेदवार MAHA TET अर्जाची फी क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड/इंटरनेट बँकिंग/वॉलेट पेमेंटद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात. पेमेंट यशस्वीरित्या केले असल्यास, व्यवहाराची पावती तयार केली जाईल. त्यानंतर, उमेदवारांनी रीतसर भरलेल्या आणि सबमिट केलेल्या MAHA TET अर्जाची प्रिंटआउट घ्यावी लागेल.
● अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या परीक्षासंबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात खलील वरील बाजूस दिलेली आहे.
अशाच नव-नवीन माहिती साठी शेजारी दिलेल्या 🔔 आयकॉन वर क्लिक करून subscribe बटण वर क्लिक करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा Facebook,Instagram ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
इतर नोकर भरती : | येथे क्लिक करा. |
भरती/नौकरी Facebook ग्रुप ला जॉइन करा : | येथे क्लिक करा. |
इंस्टाग्राम (Instagram) : | येथे क्लिक करा. |